अकोल्यातील कर्फ्यु दोन दिवसांनी वाढवला : कर्फ्यु व जमावबंदी २१ नोव्हेंबरपर्यंत कायम, उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले नवीन आदेश.
अकोला : अमरावती जिल्ह्यातील झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अश्यातच त्याचे पडसाद अकोल्यात उमटू नये या करिता अकोला उपविभागीय दंडाधिकारी डॉ.निलेश अपार यांनी अकोल्यात १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर अशी २ दिवसांची संचारबंदी व जमावबंदी जाहीर केली होती.
यामध्ये सकाळी ६ वाजेपासून तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश तर सायंकाळी ७ वाजे पासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. आता पुन्हा जमावबंदी व संचारबंदी नव्याने प्रस्तावित करण्यात आली असून आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.नव्या आदेशानुसार ही जमावबंदी आणि संचारबंदी २१ नोव्हेंबर च्या सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
सदर आदेशात खालील बाबींचा असेल समावेश
• संचारबंदी कालावधीत आरोग्य विषयक सर्व सेवा सुरू राहतील अत्यावश्यक कामे असलेली सरकारी कार्यालय सुरू राहतील असे सुद्धा आदेशात नमूद केले आहे.
• कुठल्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य करता येणार नाही.
• लसीकरण पूर्वीप्रमाणे सुरू राहतील
• विधान परिषद निवडणूक प्रचारसभेची निवडणूक निर्णय अधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक राहील.