"घोर कलियुग है भाई घोर कलियुग"
अकोला
परंतु आता वेळ पुन्हा बदलत आहे. आजारी आई-वडिलांना एकटं सोडल्यास मुलावर होईल खुनाचा गुन्हा दाखल..
हो अगदी बरोबर आता आजारी आई-वडिलांना एकटं सोडल्यास त्यांच्यावर औषधोपचार न केल्यास मुलावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे
सुनील ढवळे नामक पित्याला 2008 पासून पार्किन्सन नावाचा गंभीर आजार होता त्यामुळे अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला. लहान भावाने (पुष्कर ढवळे) आजारी वडिलांवर औषधोपचार न केल्यामुळे मोठ्या भावाने (समीर ढवळे) त्याच्या विरोधात खदान पोलिस चौकीत गुन्हा दाखल केला आहे..
मोठा भाऊ समीर ढवळे यांचं म्हणणे आहे की " 2019 साली घरगुती कारणांमुळे ते लहान भावापसून विलग झाले होते, आणि वडिलांना त्याने त्याच्याकडेच ठेऊन घेतले होते. या काळात त्याने मला वडिलांना भेटुही दिले नाही आणि वडिलांच्या मृत्यू ची बातमी ही दिली नाही असा त्यांचा आरोप आहे. सोबतच वडिलांवर लहान भावाने व्यवस्थित औषधोपचार केले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला असेही त्यांचे म्हणणे आहे. आपल्या पित्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी हा कोर्टाचा मार्ग अवलंबला आहे असे त्यांनी म्हटले
पुरावा म्हणून कोर्टाने ही लहान भावावर खदान पोलीस चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत
तेव्हा लक्षात ठेवा ज्या माता पित्याने रक्ताचे पाणी करून तुम्हाला वाढवले, जगायला शिकवले त्यांना असे वाऱ्यावर सोडू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा जेल ची हवा खावी लागेल