9 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
राफेल नौदलात दाखल होणार :
■ भारतीय वायूदलासाठी लढाऊ विमानांची आवश्यकता लक्षात घेता 2016 मध्ये फ्रान्स देशाबरोबर 36 राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत आपण करार केला होता.
■ आत्तापर्यंत 30 विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून उर्वरीत सहा लवकरच दाखल होणार आहेत
■ भारतीय वायूदलानंतर आता भारतीय नौदलही राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत चाचपणी करत आहे.
■ सध्या भारताच्या नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका असून यावर रशियन बनावटीची ‘मिग-29 के’ जातीची लढाऊ विमाने तैनात आहेत.
■ या वर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात नौदलात स्वदेशी बनावटीची विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रांत सेवेत दाखल होणार आहे, या युद्धनौकेच्या युद्धपातळीवर चाचण्या सध्या सुरु आहेत.
■ नवी विमानवाहु युद्धनौका नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज होत असून यावर कोणती लढाऊ विमाने असावी याबाबत नौदलाची चाचपणी सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आला नवा नियम :
■ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे.
या अंतर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल.
जर संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल.
अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो.
सध्या, पॉवरप्लेनंतर 30 मीटर यार्ड वर्तुळाबाहेर 5 क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ 4 क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.
याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे.
मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल.
नीट-पीजी’ला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी :
सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गासाठी 27 टक्के आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षण कायम ठेवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या (नीट-पीजी 2021) समुपदेशनास (काऊन्र्सिंलग) अंतरिम परवानगी दिली.
प्रवेश प्रक्रियेसाठी ‘तातडीची गरज’ म्हणून हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
9 जानेवारी 2022 चालू घडामोडी ठळक स्वरूपात – Current Affairs
सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक 9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला