नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या ‘भारत बायोटेक’च्या लशीच्या चाचण्यांना परवानगी:
●भारताच्या औषध महानियंत्रकांनी हैदराबादस्थित 'भारत बायोटेक’च्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे.
●तर या लशीचा उपयोग वर्धकमात्रा म्हणून करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
●‘भारत बायोटेक’ने या लशीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत औषध महानियंत्रकांकडे डिसेंबरमध्ये अर्ज केला.
●वर्धकमात्रा असलेली ही लस नाकाद्वारे देण्यात येणार असून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला यामुळे बळकटी मिळणार आहे.
●औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आणि वर्धकमात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला तत्त्वत: मान्यता दिली असून मंजुरीसाठी प्रोटोकॉल सादर करण्याचे आदेश भारत बायोटेकला दिले.
गौतम अदानींच्या कंपनीला आणखी एक कंत्राट :
देशातील आघाडीच्या उद्योगांपैकी एक असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादक कंपनीला परदेशी कोळसा पुरवठा करण्याचे मोठे काम मिळाले
तर गेल्या वर्षी देशात कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीसह अनेक कामांवर परिणाम झाला होता. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकारी मालकीच्या एनटीपीसी लिमिटेडने दोन वर्षांत प्रथमच कोळसा आयातीसाठी निविदा काढली. त्यानुसार ही जबाबदारी देण्यात आली आहे.
देशात आयात करण्यात येत असलेला थर्मल कोळशाचे सर्वात मोठे व्यापारी असलेल्या अदानी यांना वीज कंपनीला दहा लाख टन कोळसा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये, अदानी समूहाला 17,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चात मेरठ ते प्रयागराज या 594 किमी लांबीच्या सहा पदरी गंगा एक्सप्रेसवेचे काम मिळाले होते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या पगारात मिळणार अधिकचे पैसे :
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारात अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता
कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 4500 रुपये अधिकचे मिळू शकतात. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना एक वाउचर भरून द्यावा लागेल.
करोना संकटामुळे देशभरातील शाळा बंद होत्या. त्यामुळे कर्मचारी मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्यासाठी अर्ज करू शकले नव्हते. याचा फायदा 25 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
दुसरीकडे, गेल्या 18 महिन्यांपासून अडकलेल्या महागाई भत्त्यावरही निर्णय होऊ शकतो. याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्संना होणार आहे.