🚩 राजराजेश्वर पालखी महोत्सव : कोरोना थोडा कमी झाला असला तरी पूर्णतः गेलेला नाहीय, त्यामुळे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी, अकोल्यातील कावड महोत्सवात फक्त मानाची पालकी आपल्या 25 शिवभक्तांसोबत निघणार असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेेेत.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे देशातील धार्मिक स्थळं सरकारी आदेशावरून बंद करण्यात आली आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभू राजराजेश्वरांची पालखी कावड यात्रेत फक्त एक पालखी आणि 25 शिवभक्तांना परवानगी दिली आहे.
मानाच्या पालखीसोबत येणाऱ्या 25 शिवभक्तांना कोविड प्रतिबंधात्मक सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिलेले आहेत.
शेवटच्या श्रावण सोमवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहाटे 4 ते रात्री 12 या वेळेत गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिर मार्गात कर्फ्यू लादण्याचे आदेश दिले आहेत.
🚩 कशी होणार मानाच्या पालखीची मिरवणूक?
यावेळी शांतता व सुव्यवस्थेचे पालन करत मानाच्या पालखीचे आगमन आणि अकोला शहाराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला जलाभिषेक करण्यासाठी
पालखी ही ठराविक वाहनात 25 शिवभक्तांना घेऊन जाण्याचे आदेश मिळाले आहेत
🚩 पालखी महोत्सवासाठी काय आहेत महानगरपालिकेचे निबंध आणि सूचना
1) अकोला महानगरपालिका परिसरात पालखी कावड मिरवणुक मार्गवार कलम 144 लागू राहील.
2) कावड पालखीकरिता कोणत्याही साउंड सिस्टिम, वापरता येणार नाही
3) मंदिरात फक्त निर्धारित पुजारीलाच पूजा करता येईल इतर कुणाला आत प्रवेश करता येणार नाही
4) जे भाविक भक्त पालखी सोबत राहतील त्या सर्वांना कोरोना नियम पाळणे बंधनकारक असेल
5) पालखी सोबत हजार असलेल्या भाविक भक्तांनी कोरोना vaccine ची दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक असेल ई....
==================◆==================
विनंती
अशाच तपशीलवार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खालील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा