भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 08 सप्टेंबर 2021 रोजी आगामी टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रविचंद्रन अश्विनची आश्चर्यकारक एंट्री झाली आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, माजी कर्णधार एमएस धोनी आगामी T-20 विश्वचषकात भारतीय संघाचे मार्गदर्शक (mentor) असतील.
महेद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सक्रिय क्रिकेटपटू असूनही धोनीला अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवण्याचे श्रेय दिले जाते. धोनीचा संघात खूप आदर आहे आणि याच कारणामुळे माजी कर्णधाराला T-20 विश्वचषकासारख्या प्रतिष्ठित स्पर्धांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जय शहा यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात दुबईमध्ये धोनीशी संवाद साधला. त्याने भारतीय क्रिकेट संघाला केवळ T-20 विश्वचषकासाठी मार्गदर्शक बनवण्याचे मान्य केले. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनीही या निर्णयाशी पूर्णपणे सहमती दर्शवली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये T-20 विश्वचषक जिंकला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची आश्चर्यकारक वाटचाल येथून सुरू झाली. यानंतर, 2011 आयसीसी एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी 28 वर्षांनी भारताकडे आली.
या विजयानंतर दोन वर्षांनी भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. यासह, धोनी आयसीसीच्या तीनही प्रमुख ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार बनला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 332 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 200 एकदिवसीय, 60 कसोटी आणि 72 टी -20 सामन्यांचा समावेश आहे.
T20 विश्वचषक खेळाडू (Squad)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), इशान किशन (wk), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
==================◆==================
विनंती
अशाच तपशीलवार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खालील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा